नाशिक डीआयजी पथकाकडून धुळ्यातील सट्टापेढ्यांवर कारवाई

नाशिक : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाकडून आज धुळे शहर पोलिस स्टेशन हद्दीत कल्याण मटका सट्टा पेढ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सट्टापेढी व्यावसायीकांच्या गोटात खळबळ माजली आहे.

पहिल्या कारवाईत दादावाडी शैक्षणिक सांस्कृतिक क्रिडा मंडळ, धुळे येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत पेढी मालक गोविंद ज्योतीराम साखला याच्यासह व्यवस्थापक संतोष परदेशी व इतर बावीस जणांविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम12 (अ) प्रमाणे करण्यात आलेल्या या कारवाईत 16 मोबाईल (किंमत 46,500/-), रोख रक्कम रु. 72,930 असा एकुण 1 लाख 21 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुस-या कारवाईत शहरातील पाचकंदिल चौक परिसरातील हॉटेल शेरेपजांब समोर, चौधरी मार्केटजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत राकेश मोहनलाल अग्रवाल व संदिप अशोक मोहिते या दोघांवर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार करण्यात आलेल्या या कारवाईत 29 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पुढील कारवाईकामी धुळे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here