परप्रांतीय चोरटा भोपाळ येथून जेरबंद

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील जयभोले कंपनीतील कार्यालयातून 1 लाख 52 हजार 500 रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या परप्रांतीय चोरट्यास भोपाळ येथून अटक करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी अमर दयालदास कटारीया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपासात कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची विचारपूस करण्यात आली होती. कंपनीत काम करणारे बरेच कामगार परप्रांतीय होते. कामगारांच्या चौकशीत सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना समजले की या कंपनीत यापूर्वी काम करणारा भिमकुमार यादव (रा. बिहार) यास चोरी करण्याची सवय आहे. तो यापूर्वी सदर कंपनीत काम करत होता. बऱ्याच दिवसापासून तो काम सोडून गेला होता. तो जळगाव येथे येवून भोपाळ येथे गेल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोना हेमंत कळसकर, पोना सुधीर साळवे, पोकॉ चंद्रकांत पाटील यांना संशयीताच्या तपासकामी भोपाळ येथे रवाना केले. तपास पथकाने संशयीत आरोपी भिमकुमार यादव याचा मागोवा घेत त्याला भोपाळ येथील पुजा कॉलनी येथून अटक केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. कंपनीतून घरफोडी केलेली 1 लाख 52 हजार 500 रुपयांची रक्कम त्याने घरी पाठवली असल्याचे पोलिस पथकाला सांगीतले आहे. त्याला न्या. प्रिती श्रीराम यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकरी वकील अ‍ॅड. क्षिरसागर यांनी कामकाज पाहिले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकारी रतीलाल पवार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here