बेपत्ता पो.नि. संग्राम ताटे झोपले होते पुठ्ठ्यावर!– हातावरील क्रमांकाने तपास सरकला मुद्द्यावर!!

जालना (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) :  भाकरी करुन ठेव मी लगेच येतो असे पत्नीला सांगून घराबाहेर गेलेले पोलिस निरीक्षक संग्राम ताटे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा तपास लागण्यामागे शिरवळ या गावानजीक असलेल्या हॉटेलचा वेटर मुख्य दुवा ठरला आहे. या कालावधीत हॉटेलच्या वेटरनेच त्यांना खाण्यापिण्यास दिले होते. हॉटेलच्या वेटरमुळे त्यांचा तपास लागला असला तरी ते घरातून का निघून गेले होते या प्रश्नाचे उत्तर अजून अनुत्तरीत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले व सध्या पदोन्नती जाहीर झालेले सहायक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे अचानक बेपत्ता होण्यामागील गुढ अद्याप उलगडले नसले तरी ते सापडले आहे. ते सापडल्याने त्यांच्या परिवाराचा जिव भांड्यात पडला आहे. संग्राम ताटे यांनी जालना ते शिरवळ हे सुमारे 300 ते 350 अंतर पायी पायी कापत दहा दिवसांचा कालावधी लावला. त्यानंतर ते शिरवळ नजीक हॉटेल गुरुकृपा स्नॅक्स सेंटर येथील शेडमधे मुक्कामी होते. एका पुठ्ठ्यावर झोपून रहायचे आणि वेटरने काही खायला दिले तर खायचे नाहीतर पुन्हा झोपून रहायचे असा त्यांचा नित्यक्रम होता. मात्र इकडे त्यांच्या शोधात पोलिस खाते आणि त्यांचे परिजन हवालदिल झाले होते. त्यांच्यासोबत ना मोबाईल, ना पैशांचे पाकीट ना एटीएम अशा अवस्थेत ते घरातून निघाले होते. त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. एखाद्या मुसाफिर व्यक्तीप्रमाणे तिनशे किलोमिटर अंतर पायी चालत शिरवळ नजीक हॉटेलपर्यंत आले होते.

त्यांच्या हातावर पेनाने एक मोबाईल क्रमांक आणि संग्राम असे लिहिले होते. हा नंबर कुणी लिहिला होता हे देखील एक कोडे असले तरी त्या मोबाईल क्रमांकानेच त्यांचा तपास लागला. हॉटेल गुरुकृपा या हॉटेलमधे राजु सिंग नावाचा वेटर होता. त्याने त्यांची विचारपुस केली. मात्र ते काहीच बोलण्यास तयार नव्हते. वेटरने त्यांना रोज थोडेफार खाण्यास दिले. पुठ्ठ्यावर झोपून रहत असलेल्या ताटेंच्या हातावरील मोबाईल क्रमांकावर त्याचे लक्ष गेले. त्याने सहज त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला. पलीकडून तो फोन ताटे यांची पत्नी निलम ताटे यांनी उचलला. आपले पती शिरवळ येथे असल्याची माहिती मिळताच निलम ताटे यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर त्यांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर मात्र वेटरचा फोन स्विच ऑफ येवू लागला. त्यामुळे निलम ताटे यांनी संग्राम ताटे यांचे बॅचमेट हनुमंत गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. पो.नि. हनुमंत गायकवाड यांनी शिरवळ येथील त्यांचे परिचीत असलेले युवराज ढमाळ यांना हॉटेल गुरुकृपा येथे जावून पाहणी करण्यास सांगितले. सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ यांनी तातडीने शिरवळ येथील हॉटेल गुरुकृपा येथे जाऊन पुठ्ठ्यावर झोपलेल्या संग्राम ताटे यांचे मोबाईल मधे फोटो काढले. ते फोटो त्यांनी लागलीच पो.नि. हनुमंत गायकवाड यांना व्हाटस अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवले. त्यांनी हा आपलाच बॅचमेट अधिकारी संग्राम ताटे असल्याचे  ओळखले. पो.नि. हनुमंत ताटे यांनी संग्राम ताटे हे शिरवळ येथे असल्याचे निलम ताटे यांना कळवले.

राजु सिंग (वेटर)

अशा प्रकारे बेपत्ता पो.नि. संग्राम ताटे हे शिरवळ येथे असल्याचे नक्की झाले.  याप्रकाराची माहिती खंडाळा पोलिस स्टेशनला देण्यात आली. खंडाळा पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश इंगळे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने धाव घेत संग्राम ताटे यांना ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. व्यवस्थित अन्नपाणी मिळाले नसल्यामुळे आणि तिनशे किलोमिटर पायी चालून आल्यामुळे त्यांच्या पायाला सुज आलेली होती. मात्र हॉटेलच्या वेटरने त्यांना खाण्यापिण्यास दिल्याने त्यांनी तग धरली होती एवढे निश्चित. हॉटेलचा वेटर राजु सिंग हा ताटे यांचा शोध लागण्यात एक महत्वाचा आणि मुख्य दुवा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here