मोटर सायकल चोरटे एलसीबीने केले गजाआड

On: February 16, 2022 3:38 PM

जळगाव : जळगावसह नाशिक शहरातून मोटार सायकली चोरणा-या दोघा चोरट्यांंना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने गजाआड केले आहे. यातील एक चोरटा अल्पवयीन आहे. रुपेश संजय पाटील असे अटकेतील मुख्य मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. रुपेशच्या ताब्यातून चार व अल्पवयीन चोरट्याच्या ताब्यातून एक अशा एकुण पाच मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.

धरणगाव तालुक्यातील साकरे येथील रहिवासी रुपेश संजय पाटील हा त्याच्या अल्पवयीन साथीदारासह जळगाव शहरातून मोटार सायकली चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून रुपेश यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

त्याने दिलेल्या कबुलीतून व हस्तगत करण्यात आलेल्या चोरीच्या मोटार सायकलींच्या माध्यमातून जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनमधील दोन, जळगाव शहर पोलिस स्टेशनमधील दोन व पंचवटी पोलिस स्टेशन नाशिक येथील एक असे एकुण पाच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी रुपेश यास जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पो,.नि. किरणकुमार बकाले यांच्यासह स.फौ.अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील,अक्रम शेख, संदीप साबळे, पोना. राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील, प्रविण मांडोळे, उमेश गोसावी, हेमंत पाटील, दिपक शिंदे, मुबारक देशमुख आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment