जळगाव : एमआयडीसी परिसरातील जयभोले नावाच्या कंपनीतील चोरीच्या घटनेतील चोरट्यास भोपाळ येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या रकमेपैकी 1 लाख 3 हजार रुपये रोख व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. चोरट्याने कंपनीच्या गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवत लॉकरचे कुलुप तोडून 1लाख 52 हजार 500 रुपये रोख व मोबाईल चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 9 ते 10 फेब्रुवारी सदर घटना घडली होती.
पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, हे.कॉ.रतीलाल पवार, पोलिस नाईक हेमंत कळसकर, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुकेश पाटील,पो. कॉ.चंद्रकांत पाटील यांचे पथक गुन्ह्याच्या तपासकामी तयार करण्यात आले होते. आरोपीबाबत सहायक फौजदार अतुल वंजारी यांना गुप्त माहिती समजली होती. त्यानुसार पथकाला भोपाळ येथे रवाना करण्यात आले होते. गुन्ह्यातील घरफोडीची रक्कम त्याने भोपाळ येथे मित्राकडे ठेवली असल्याचे सांगितले होते.