गरोदर विवाहितेस अश्लिल शिवीगाळ व छेडखानी

On: February 18, 2022 2:20 PM

जळगाव : लग्नसमारंभातून घरी जात असलेल्या गरोदर विवाहितेची छेडखानी व अश्लिल दर्जाहीन स्वरुपातील शिवीगाळ करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका खासगी दुकानावर काम करणारी विवाहीता रामेश्वर कॉलनी भागातील एक लग्न समारंभ आटोपून घरी पायी पायी जात होती. दरम्यान तिच्या पतीचा परिचीत असलेला एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने तिच्या नाजुक अंगाला स्पर्श केला. या कृत्यानंतर त्याने तिला ढकलून देत अतिशय हीन दर्जाची शिवीगाळ केली. या कृत्यानंतर रस्त्यावर गर्दी जमल्यानंतर तो तेथून निघून गेला. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment