घरफोडीच्या हेतूने फिरणा-या पाच संशयीतांना अटक

On: February 19, 2022 2:32 PM

जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने एमआयडीसी परिसरात फिरणा-या पाच संशयीतांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील पाचही जण एमआयडीसी हद्दीतील जुनी ट्रायडंट कंपनीजवळ तसेच जळगाव शहरातील मेहरुण स्मशानभुमी परिसरात चोरी, घरफोडी करणार असल्याची खात्रीशीर माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला समजली होती.

सलमान अजीम तडवी (25) रा. मेहरुण बांधाजवळ मंगलपुरी रामेश्वर कॉलनी जळगाव, सुनिल शेषमल चव्हाण (24) रा. मंगलपुरी रामेश्वर कॉलनी जळगाव, तुषार डिगंबर सासवडे (30) रा. तुळजामाता नगर रामेश्वर कॉलनी जळगाव, महाविर किशोर जैन (31) रा. रामबाबा कुटीयाजवळ मंगलपुरी रामेश्वर कॉलनी जळगाव, शोएब बेग मुश्ताक बेग (26) रा. मेहरुण बांधाजवळ मंगलपुरी रामेश्वर कॉलनी जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, इम्रान सैय्य्द, मुदस्सर काझी, योगेश बारी, साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment