अष्टविनायक – ओझरच्या गणपती मंदिरात चोरी

ओझरच्या गणपती मंदिरात चोरी

ओझर : सुप्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओझरचे गणपती मंदीर प्रसिद्ध आहे. या गणपती मंदीरात मध्यरात्री सव्वा दोन वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे. या चोरीत गणपती मुर्तीच्या मुकुटावरील जवळपास दीड किलो वजनाची चांदीचा मुलामा असलेली छत्री व तिजोरीमधील एक हजार रुपये चोरी झाले आहेत.

लॉकडाऊन काळात मंदिर बंद आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरु होण्यापुर्वीच मंदिर देवस्थानाने श्रींचे सगळे सुवर्ण आभुषणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी तिजोरीतील रक्कम बॅंकेच्या लॉकरमधे ठेवल्यामुळे बराच मुद्देमाल वाचला.

मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन व्यक्ती कैद झाल्या आहेत. त्यांच्या हातात लोखंडी साहित्य दिसून येत आहे. लॉकडाऊन मुळे मंदीर १७ मार्चपासून बंद आहे. या घटनेत रोख रकमेसह ८० ते ९० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी हजेरी लावली. पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. परशुराम कांबळे व त्यांचे  सहकारी करत आहेत. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here