जळगाव : जळगाव पाचोरा दरम्यान वावडदा गावानजीक वारंवार वाहतुक ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर गेल्या आठ दिवसांपासून गटारीचे काम सुरु आहे. संथ गतीने सुरु असलेल्या या कामाचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.
दररोजच्या या प्रकारामुळे वाहनधारकांमधे संतापाची लाट उसळली आहे. 20 फेब्रुवारी रोजी ठप्प झालेल्या वाहतुकीदरम्यान धक्का लागलेल्या दोन वाहनधारकांमधे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. अगोदरच ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना या वादामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले. या मार्गावर संथ गतीने सुरु असलेल्या या कामाची तक्रार वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब रविंद्र पाटील यांनीवेळोवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र ठेकेदाराकडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. वारंवार ठप्प होणा-या वाहतुकीवर उपाययोजना होण्यासाठी गटारीचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्याची मागणी केली जात आहे.