प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला

On: February 21, 2022 5:06 PM

जळगाव : बहिणीसोबत प्रेमसंबंध ठेवणा-या तरुणावर तिच्या भावाने केलेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातून मुलीच्या भावाने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी तरुणावर सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. 20 फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेने सम्राट कॉलनी परिसरात खळबळ माजली आहे.

या घटनेतील जखमी तरुण अठरा वर्षाचा असून त्याची प्रेयसी सतरा वर्षाची आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील रहिवासी तरुण रात्री साडे नऊ वाजता दुध घेण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. त्यावेळी त्याच्यावर त्याच्या प्रेयसीच्या भावाने चाकू हल्ला केला. या घटनेची माहिती जखमी तरुणाच्या घरी समजली तोपर्यंत त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी तरुणाच्या मानेवर पाठीवर आणि हातावर चाकूचे वार करण्यात आले आहे. जखमीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment