मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील नायिका तथा ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे आज सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले . कुमकुम यांनी शंभराहून अधिक चित्रपटात काम केले आहे.
वृद्धापकाळाने आजारी असलेल्या कुमकुम वैद्यकीय उपचार घेत होत्या. कधीकाळी मुंबईच्या लिकिंग रोडवर त्यांचा बंगला होता. या बंगल्याचे नाव “कुमकुम” ठेवण्यात आले होते. हा बंगला नंतर पाडण्यात आला होता व त्याठिकाणी दुसरी इमारत बांधण्यत आली.
जुन्या काळात कुमकुम यांनी अनेक हिट व दर्जेदार सिनेमात काम केले अहे. सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार आणि अभिनेता गुरू दत्त यांच्यासोबत कुमकुम यांनी अभिनय केला आहे. मिस्टर एक्स इन बॉम्बे (१९६४), मदर इंडिया (१९५७), सन ऑफ इंडिया (१९६२), कोहिनूर (१९६०), उजाला, नया दौर, श्रीमान फंटूश, एक सपेरा एक लुटेरा अशा एक ना अनेक हिंदी चित्रपटातील कुमकुम यांचा अभिनय त्याकाळी गाजला आहे.