राष्ट्रवादीच्या बिड महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल

On: February 22, 2022 2:17 PM

बीड : मानलेल्या सासूने सांगितले म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बिड महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्यासह एकाविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत पिडीतेची मानलेली सासू संगिता तुपसागर या आहेत. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पिडीतेला तिच्या पतीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी संगिता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटूंबिक हिंसाहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment