अल्पवयीन मुलीवर आठ जणांकडून अत्याचार

On: February 22, 2022 4:00 PM

सातारा :  खाऊ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण येथे उघड झाली आहे. या घटनेत आठ जणांव्यतिरिक्त एका महिलेचा देखील सहभाग असल्याचे समोर आले आहे. पाटण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून एकुण नऊ आरोपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलीच्या आईने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार मतिमंद असल्याचा गैरफायदा घेत खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला फिरायला नेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. लैंगिक अत्याचार व बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 17 नुसार याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून निष्पन्न झालेले सर्व नऊ आरोपी अटक करण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment