जादूटोण्याच्या संशयातून जमावाने पेटवले घर

On: February 23, 2022 12:44 PM

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील तरोडा येथील भोरे दाम्पत्यावर जादूटोणा करत असल्याच्या संशयातून सात जणांनी त्यांचे  घर पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. 20 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान भुसारे (30), प्रफुल्ल भुसारे (35), आकाश धुळे (30), गोलू धुळे (25), भगवान धुळे (45), भीमराव धुळे (45) अशी गुन्हा दाखल झालेल्या व अटक करण्यात आलेल्या तरोडा येथील संशयीतांची नावे आहेत.

उमरखेड तालुक्यातील तरोडा या गावी विनायक भोरे व उर्मिला भोरे हे दाम्पत्य घरी असताना तोंडाला बांधुन घरात आलेल्या जमावाने तुम्ही जादूटोणा करता म्हणुन तुम्हाला जीवे मारण्यात का येवू नये असे म्हणत लाठया काठ्यांनी मारहाण सुरु केली. त्यानंतर डिझेल टाकून त्यांचे घर पेटवून देण्यात आले. उर्मिला व विनायक यांनी मारेकऱ्यांकडून जेमतेम सुटका करत पलायन केले. दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment