जळगाव : भुसावळ तालुक्यातील टहाकळी या गावातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास दोन कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे. सागर प्रकाश ढिके असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासकामी वरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अटकेतील आरोपी सागर ढिके याच्या कब्जातून दोन गावठी कट्टे, एक जिवंत काडतुस, असा एकुण 51 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी सहायक फौजदार वसंत लिंगायत, युनुस शेख, हे.कॉ. दिपक पाटील, साहेबराव चौधरी, महेश महाजन, पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, अशोक पाटील, चालक मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.