जामीनावर सुटताच माजी महापौरांचे शक्तीप्रदर्शन

On: February 26, 2022 11:02 AM

मालेगाव : गोळीबार प्रकरणातील संशयीत असलेले माजी महापौर अब्दुल मलिक युनुस इसा हे जामीनावर सुटताच कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत केले. युद्धभुमीवरुन एखादा पराक्रम करुन आल्याप्रमाणे करण्यात आलेले त्यांचे स्वागत बघून पोलिसांनी मलिक यांच्यासह एमआयएमचे मनपा गटनेते असलेले त्यांचे बंधू डॉ. खालिद परवेज, नगरसेवक मजिद युनुस इसा व इतर शेकडो कार्यकर्त्यांविरोधात किल्ला पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला. 

8 जानेवारी रोजी जमीन कब्जा वादातून म्हाळदे शिवारात गोळीबारीची घटना घडली होती. या गुन्ह्यात पवारवाडी पोलिसांनी माजी महापौर मलिक यांना अटक केल्यापासून ते नाशिक कारागृहात होते. गुरुवारी सुटका होताच त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फुलांनी उधळण करत त्यांचे कारागृहाबाहेर स्वागत केले. विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी किल्ला पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment