सुशांत राजपूत आत्महत्येला नवे वळण रिया चक्रवर्तीवर बिहारमधे गुन्हा दाखल

On: July 29, 2020 10:51 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या विविध कारणाने गाजत आहे. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण आता नव्या वळणावर आले आहे. आत्महत्या करणा-या सुशांतच्या वडीलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती  व तिच्या परिवारावर बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

बिहारमध्ये रियाविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे आता बिहार पोलीस या प्रकरणी चौकशी करणार आहेत. बिहार पोलिसात दाखल तक्रारीनुसर  रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतर जणांविरुद्ध फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की “या कटात रिया आणि तिच्या परिवारातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी आपल्या मुलासोबत सलोखा वाढवला होता. हे सर्वच जण आपल्या मुलाच्या प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करत होते.

सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्य तक्रारीनुसार, गेल्या वर्षी त्याच्या बॅंक खात्यात १७ कोटी रुपये होते. या रकमेपैकी १५ कोटी रुपये त्याचा संबंध नसलेल्या खात्यात वर्ग झाले. सुशांतचे क्रेडिट, डेबिट कार्ड रियाच्या ताब्यात होते. त्यामुळे तिच्यासह तिच्या परिवाराने हे पैसे खर्च केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. पुढील चौकशी सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment