जळगाव : एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील सुभाष रामदास पाटील यांचे चिरंजीव योगेश आणि धुळे जिल्ह्यातील हतनुर ता. शिंदखेडा येथील संजय आनंदा पाटील यांची कन्या अश्विनी या वधु वरांचा विना हुंडा विवाह नुकताच 17 फेब्रुवारी रोजी एरंडोल येथे उत्साहात झाला.
मराठा कुणबी समाजातील या विवाहाचे कौतुक होत आहे. या विना हुंडा विवाहासाठी खानदेश मराठा कुणबी वधु वर परिचय गृपचे संस्थापक बापुसाहेब सुमित पाटील आणि उपाध्यक्ष नानासाहेब किशोर एम. पाटील खडगावकर यांचे सहकार्य लाभले. विनाहुंडा विवाह ही काळाची गरज असल्याचे बापुसाहेब सुमित पाटील यांनी म्हटले आहे.