पोलिसांच्या सतर्कतेने गुन्ह्यापुर्वीच गुन्हेगार जाळ्यात

जळगाव : चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने आपली ओळख लपवत फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. चोरी, घरफोडीचा संभाव्य गुन्हा या कारवाईमुळे टळला असून ताब्यातील तिघांची कसून चौकशी व तपास सुरु आहे. शाहरुख राजु पिंजारी (26) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव, समीर जुम्मा पिंजारी (20), रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव व फिरोज खान अब्दुल खान (36) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव अशी तिघांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 मार्च रोजी रात्रीच्या वेळी सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर पाटील, पोलिस नाईक सुधीर सावळे, पो.कॉ. मुकेश पाटील, पो.कॉ. सचिन पाटील आदींचे पथक रात्रगस्त करत होते. गस्तीदरम्यान तांबापुरा परिसरात रात्री 10 वाजेनंतर सदोबा वेअर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला तिन तरुण संशयास्पद अवस्थेत वावरतांना पथकाला आढळून आले. तिघे तरुण आपला चेहरा झाकून अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होते. त्यांच्या संशयास्पद हालचाली बघता पथकाने त्यांचा पाठलाग केला. आपल्या मागावर पोलिस असल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी पलायन करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र तिघांना ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. ताब्यातील तिघे तरुण काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तीत्व लपवत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिस नाईक सुधीर सावळे यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 122 (ब) नुसार सदर गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here