जळगाव : जळगाव – सिंधी कॉलनी भागात चॉपरने हल्ला करुन पोलिसांच्या रेकॉर्डवरील तरुणाला जखमी करणा-या तिघांना एलसीबीच्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार भोलासिंग बावरी यास 28 फेब्रुवारीच्या रात्री तिघांनी हल्ला करत एकाने धारदार शस्त्राने जखमी केले होते. विक्की भगवान कोळी(24) रा. कांचन नगर जळगाव आणि दिपक संजय साळूंखे (24) रा. बारा खोल्या प्रजापत नगर जळगाव असे अटकेतील दोघा तरुणांची नावे आहेत. अटकेतील तिघांपैकी एक अल्पवयीन बालक आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा घडल्यानंतर एलसीबीचे पो. नि. किरणकुमार बकाले यांनी तातडीने आरोपींची माहिती काढत तपास पथकाची निर्मिती केली होती. निशांत चौधरी व त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे तपासादरम्यान पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजले. त्या माहितीच्या आधारे पथकाने केलेल्या तपासात तिघे हल्लेखोर जैनाबाद – आसोदा रस्त्याने पल्सर मोटार सायकलवर फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तिघांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चॉपर आणि मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांना पुढील तपासकामी एमआयडिसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील अल्पवयीन बालकाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने एमआयडीसी हद्दीत केलेल्या एका गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे. या तपासकामी पो. नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलिस नाईक प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, अविनाश देवरे आदींनी सहभाग घेतला.