जळगाव : पारोळा तालुक्यातील मेहू येथील घरफोडीप्रकरणी तिघा आरोपींना एलसीबी पथकाने अटक केली आहे. कृष्णा अभिमन वाघ (भिल), विशाल जगदीश पाटील व रोहीत सुनिल पाटील अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे असून तिघे मेहू ता. पारोळा येथील रहिवासी आहेत.
या तिघांनी मिळून मेहू गावातील योगेश वना चव्हाण यांच्या घरातील 12 हजार रुपये रोख व विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. गुन्हा करतांना कृष्णा वाघ हा अगोदर योगेश वना चव्हाण यांच्या घरात उतरला होता. घरात उतरल्यानंतर त्याने घराची आतून लावलेली कडी उघडली होती. त्यानंतर त्याचे साथीदार विशाल पाटील व रोहीत सुनील पाटील असे दोघे आत आले. त्यानंतर तिघांनी मिळून घरफोडीचा गुन्हा केला होता. या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संदिप पाटील, पो.ना. प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, पो.ना. राहुल बैसाणे, पो.कॉ. सचिन पाटील, तांत्रीक पथकातील हवालदार संदिप साळवे, पो.कॉ. इश्वर पाटील, चालक पोलिस नाईक अशोक पाटील, चालक पो.कॉ. मुरलीधर बारी आदींनी तपासकामी सहभाग घेतला. आरोपी व त्यांच्याकडून हस्तगत केलेला मुद्देमाल पुढील तपासकामी पारोळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात देण्यात आला आहे.