भावाने केला बहिणीचा खून

On: July 29, 2020 1:47 PM

बुलडाणा : आज सकाळी बुलढाणा शहरात भावाने बहिणीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. नात्याला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना बुलडाणा शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटीत घडली. सख्या भावाने आपल्या बहिणीचा गळा आवळून ठार केले आहे. सागर शर्मा असे बहिणीचा खून केलेल्या आरोपी भावाचे नाव असून अंकिता शर्मा मयत बहिणीचे नाव आहे.

आज सकाळी सागर याने त्याच्या बहिणीला बेदम मारहाण केल्यानंतर संतापाच्या भरात गळा दाबून निघृण हत्या केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली. मृत अंकिता शर्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. खुनाचे कारण अजून स्पष्ट होवू शकले नाही.

आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार असल्याची माहीती पुढे आली आहे. बहिणीचा खून केल्यानंतर तो स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. त्याने खुनाची कबुली दिली आहे. पुढील तपास बुलढाणा पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment