जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

जळगाव – जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन केले आहे. जैन व्हॅलीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये सुरक्षा प्रतिज्ञा घेण्यात आली. जैन व्हॅली परिसरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी एस. डी. गुप्ता, व्ही. पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सेफ्टी विभागाचे डी. जे शितोळे, मानव संसाधन विभागाचे जी. आर. पाटील, कैलास सैंदाणे, योगेश्वर पवार यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून 4 मार्च देशभर साजरा केला जातो. 4 मार्च 1966 रोजी देशात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. देशातील सर्व उद्योग, आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 मार्च हा आठवडा सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान जैन इरिगेशन सिस्टिम्स ली., जैन फार्मफ्रेश फूड्स लि., जैन हिल्स, जैन व्हॅली, गांधी रिसर्च फाऊंडेशन यासह कंपनीच्या विविध आस्थापनांमध्ये राष्ट्रीय सुरक्षाविषयी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. आजच्या दिवशी कंपनीमधील सहकाऱ्यांनी सुरक्षा प्रतिज्ञा घेतली. तसेच या सप्ताहादरम्यान सेफ्टी ट्रेनींग, मॉकड्रील, सेफ्टी सर्वे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेचे आयोजन – सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी म्हणून सेफ्टी विभागातर्फे जैन इरिगेशनच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच सेफ्टी स्लोगन हा विषय घेऊनदेखील स्पर्धा घेतली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here