धुळे : डीआयजी नाशिक तसेच धुळे तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज केमीकलने भरलेल्या दोन टॅंकरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत केमिकलने भरलेले 2 टँकंर, केमिकलने भरलेले प्लास्टिक ड्रम, असा एकुण 1 करोड 81 लाख 66 हजार 614 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे विशेष पथक तसेच स्थानिक पोलिसांच्या या कारवाईत धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील वीर चैतन्य हॉटेलच्या मागे टाकण्यात आलेल्या छाप्यात ज्वलनशील पदार्थाचा साठा आणि अवैध वाहतुक सुरु असल्याचे पोलिसांच्या पथकाला आढळून आले. टॅंकर मालक अनिलकुमार चव्हाण (रा.बडोदा -गुजरात व अफजल बेग नियाज बेग मिर्झा रा.नेर ता.जि.धुळे या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार सजंय बैसाणे रा. धुळे, गणेश जैस्वाल रा.नेर ता.जि.धुळे, लवलेस जाट रा.नेर ता.जि.धुळे, चालक घेवाराम प्रेमाराम रा.राजस्थान, चालक मनाराम हासुराम रा.राजस्थान असे फरार झाले आहेत. गु.र.न. 141/22 भा.द.वि. 407, 411, 285, 34 नुसार कारवाई करण्यात आली आहे. मुद्देमाल व अटकेतील आरोपी धुळे तालुका पोलिसांच्या ताब्यात आहेत.