नाशिक : भुसावळ नगरपालिकेतील नगरसेवक तथा आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रविंद्र उर्फ हम्प्या खरात याचा खून करणारा फरार आणि मुख्य मारेकरी तब्बल तिन वर्षांनी नाशिक रोड पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. नाशिक रोड पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. अरबाज खान उर्फ गोलू खान असे अटकेतील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. हम्प्याचा खून केल्यानंतर गेल्या तिन वर्षापासून तो फरार होता.
कारागृहात असलेल्या गुन्हेगारांना भेटण्यासाठी अरबाज आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. सन 2019 मधे हम्प्या व त्याच्या परिवारातील चौघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी विशाल पाटील, विष्णू गोसावी, मनोहर शिंदे, राकेश बोडके, सोमनाथ जाधव, कुंदन राठोड, केतन कोकाटे, सागर आडणे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.