संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार परिसरातील घारगावनजीक कोठे बुद्रूक या गावातील खांडगेदरा येथे आई व तिच्या तिघा बालकांचे शव विहिरीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आई स्वाती बाळासाहेब ढोकरे, भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (4), माधुरी बाळासाहेब ढोकरे (3) सर्व रा. खांडगेदरा ता. संगमनेर अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.
या घटनेची माहिती समजताच कळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या महिलेने आपल्या मुलांसह विहीरीत उडी घेऊन आपली व मुलांची जीवनयात्रा का संपवली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहांचा पंचनामा केला असून शव विच्छेदन कामी मृतदेह रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.