प्रेमात अडसर ठरणा-या प्रेयसीच्या पतीची हत्या

On: March 6, 2022 10:14 AM

बुलढाणा : तिस वर्षाच्या विवाहीतेच्या पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली तिच्या कथित प्रियकरास अटक करण्यात आली आहे. 4 मार्च रोजी लोणार तालुक्यातील सारस्वत येथे सदर घटना घडली व 5 मार्च रोजी उघडकीस आली. या घटनेतील संशयीत प्रियकराविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या अटकेत आहे. कैलास अश्रुबा इंगोले (38) रा. सारस्वत ता. लोणार असे मयताचे तर श्याम काशीराम दुधमोगरे (20), रा. सारस्वत असे संशयित प्रियकराचे नाव आहे. या घटनेतील प्रियकर हा प्रेयसीपेक्षा दहा वर्षाने लहान आहे.

मयत कैलास इंगोले याचा मृतदेह शेतात आढळल्यानंतर सुरुवातीला लोणार पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मयताच्या डोक्यावर मारहाणीचे व्रण आढळून आल्यानंतर खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. मयत कैलासच्या पत्नीचे गावातील श्याम दुधमोगरे या वीस वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची गावात चर्चा होती. दोघांच्या प्रेमात मयत अडसर ठरत होता असे म्हटले जाते. त्यातून हा खूनाचा प्रकार झाल्याचा आरोप मयताच्या बहिणीने केला आहे. अटकेतील संशयीत प्रियकर श्याम याने मयताच्या पत्नीसोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पुढील तपास डीवायएसपी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस स्टेशनच्या प्रभारी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज काळे, पोना चंद्रकांत मुरडकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment