महाराष्ट्र व जळगांव जिल्हा क्रिकेट असोशिएशन-क्रिकेट स्पर्धेस उद्या सुरवात

On: March 6, 2022 7:51 PM

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या सिनियर गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेस उद्या सोमवार दिनांक 7 मार्च 2022 पासून अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर सुरुवात होत आहे. जळगांव जिल्हा संघाच्या गटात जालना, औरंगाबाद, धुळे या जिल्हा संघाचा तर पुणे येथील क्लब ऑफ महाराष्ट्र व युनायेड क्रिकेट क्लब यांचा समावेश आहे.

यजमान जळगांव संघाचा पहिला सामना उद्या जालना जिल्हा संघाविरुद्ध होणार आहे. या प्रथम सामन्यासाठी जळगांव जिल्हा संघ पुढील प्रमाणे आहे. राहुल निंभोरे (कर्णधार), साहिल गायकर, सिद्धेश देशमुख, प्रद्युम्न महाजन (यष्टिरक्षक), अक्षय कोल्हे, सौरभसिंग, प्रसन्न निळे, राहुल पवार, रोहित बोदडे, रोहित तलरेजा, जितेंद्र पाटील, धवल हेमनानी, नीरज जोशी, स्वप्नील जाधव, प्रतिक चतुर्वेदी, लोकेश पाटील आदी.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment