प्लॅस्टीक पिस्तुलचा धाक दाखवला नकली!— महिला वकिलाचे मंगळसुत्र लुटले असली!!

On: March 7, 2022 10:27 AM

नाशिक : प्लॅस्टीकच्या नकली पिस्तुलच्या धाकावर महिला वकिलाचे मंगळसुत्र लुटण्याचा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला. धाक दाखवणा-या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली, मात्र त्याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला. संदीप लक्ष्मण पाटील असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताचे नाव आहे.

नाशिक शहरातील मखमलाबाद रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयातील लग्न समारंभात अ‍ॅड. पुजा भडांगे (रा. संगमनेर जिल्हा नाशिक) उपस्थित होत्या. एका खोलीत त्या आपल्या बाळाचे स्तनपान करत होत्या. दरम्यान दोघा संशयीतांनी त्यांच्याजवळ येत प्लॅस्टीकच्या बंदुकीच्या धाकावर त्यांच्या गळ्यातील 46 हजार रुपये मुल्याचे मंगळसुत्र आणि नेकलेस लुटून नेला. अ‍ॅड. भडांगे यांनी आरडाओरड केल्यानंतर हॉलमधील उपस्थितांच्या हा प्रकार लक्षात आला. हॉलमधील उपस्थितांनी तातडीने एकाला पकडून ठेवले. मात्र दुसरा पलायन करण्यात यशस्वी झाला. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment