धारदार शस्त्राच्या हल्ल्यात तरुण मृत्युमुखी

On: March 7, 2022 11:58 AM

जालना : अनैतीक संबंधाच्या संशयातून धारदार शस्त्राने तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली मौजपुरी पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकुमार भास्कर साळवे (30) रा. धानोरा असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील भास्कर रामभाऊ साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच संशयितांविरुद्ध भा.द.वि. 302 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

प्रकाश गणपतराव कदम, अशोक निवृत्ती कदम, कुंडलिक निवृत्ती कदम, दत्तात्रय अशोक भुतेकर (धानोरा) व निपाणी पोखरी येथील बंडू तिकांडे यांचा मुलगा (पुर्ण नाव माहिती नाही) अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी सकाळी राजकुमार साळवे हा घराबाहेर पडला होता. त्यानंतर विरेगाव-रांजणी रत्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. अनैतिक संबंधाच्या संशयातून पाच जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment