जळगाव : जळगाव शहरातील जानकीनगर भागात आज सायंकाळी सिलेंडरचा स्फोट झाला. या भिषण घटनेत एक जण जागीच ठार झाला. दुसरा गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. बंसीलाल सुवालाल पांडे असे मयत कॅटरींग ठेकेदाराचे नाव आहे. या घटनेने जानकी नगर भागात शोककळा पसरली आहे.
जानकीनगर भागात स्वयंपाकाच्या ऑर्डरचे काम सुरु असतांना सदर घटना घडली. अचानक सिलेंडरचा भडका उडाला आणि सर्वांची धावपळ झाली व एकच हल्लकल्लोळ माजला. या घटनेत बंसीलाल पांडे (55) यांचा जागीच मृत्यु झाला आहे.त्यांचे सहकारी बालकिसन पांडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस नाईक मुदस्सर काझी, किशोर पाटील यांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.







