तीन अट्टल चोरटे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात

On: March 8, 2022 8:47 PM

जळगाव :  रात्र गस्तीदरम्यान तिघा तरुणांना जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने बहिणाबाई उद्यान परिसरातून ताब्यात घेतले असता ते अट्टल चोरटे असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी स्टेडियम कॉम्प्लेक्स व अंकुर हॉस्पीटल जवळ असलेल्या टप-या फोडल्याचे कबुल केले. त्यांच्या ताब्यातून एकुण 47 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पराग रवींद्र जावळे (21) रा सम्राट कॉलोनी जळगाव, अमर शांताराम भारोट (28) रा. शिवाजीनगर जळगाव आणि मुकेश रमेश राजपूत (24) रा. नाथवाडा जळगाव अशी त्यांची नावे आहेत. सिलेंडर, पातेले, चिल्लर, पैसे ठेवण्याचा गल्ला अशा वस्तूंसह गुन्ह्यात  वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोलिस नाईक जुबेर तडवी, पो.कॉ. अमित मराठे, पो.कॉ. देविदास पाटील, पो.कॉ. प्रमोद पाटील, होमगार्ड विनोद ठाकूर, होमगार्ड विशाल सोनार, होमगार्ड सचिन मनोरे आदींनी या कारवाईत सहभग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक जुबेर तडवी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment