लॉकअपमधील अस्वच्छतेने कोट्याधिश व्यापा-याचा संताप

यवतमाळ :  हैद्राबाद येथील करोडपती व्यापा-याला एका प्रकरणात यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधे मुक्कामाची वेळ आली. गेल्या दोन दिवसांपासून संशयीत आरोपीच्या रुपात हा व्यापारी अवधूतवाडी पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधे मुक्कामी आहे. मुकुंद माहेश्वरी उर्फ डागा (49) असे या व्यापा-याचे नाव आहे.

लॉकअप मधील अस्वच्छतेमुळे हा व्यापारी कमालीचा वैतागला आहे. त्याने आपला सर्व संताप पोलिस कर्मचा-यांवर व्यक्त केला आहे. व्यापा-याने रात्रभर कर्मचा-यांना हैरान करुन सोडल्यानंतर अधिका-यांनी लॉकअपला भेट देत त्याला खडसावले.  एका प्रकरणात अवधुतवाडी पोलिसांनी या व्यापा-याला हैद्राबाद येथून अटक करत यवतमाळ येथे आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.  6 मार्च रोजी लॉकअप मधे प्रवेश केल्यानंतर तेथील अस्वच्छतेने त्याला हैरान करुन सोडले. त्यामुळे त्याने कर्मचा-यांना हैरान करुन सोडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here