अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील सारडानगरी परिसरातील रहिवासी स.पो.नि. रविंद्र शिंदे यांच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स.पो.नि. रविंद्र शिंदे हे अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. 1 लाख 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार 4 मार्च रोजी स.पो.नि. शिंदे यांचे कुटूंब बीड येथे गेले होते. ते 7 मार्च रोजी रात्री अकरा वाजता परत आले. यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसून आला. हॉलमधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे देखील निदर्शनास आले. एकुण 1 लाख 26 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल गेल्याचे त्यांना आढळून आले. त्यात दगिने, घड्याळ अशा वस्तूंचा समावेश आहे.