साकरी येथे आढळला शेतक-याचा मृतदेह  

ळगाव : भुसावळ तालुक्यातील साकरी येथील रहिवासी ज्ञानदेव वनराज बोरोले (52) यांचा मृतदेह मंगळवारी शेतात आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. 

तालुका पोलिस स्टेशनचे स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांनी घटनास्थळी भेट दिली. ज्ञानदेव बोरोले यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनकामी रवाना करण्यात आला आहे. शव विच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.  मयत ज्ञानदेव बोरोले यांना ह्रदयविकाराचा धक्का आल्याने त्यांच्या मृत्यु झाला असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here