यंत्रमाग कारखानदाराचे अपहरण करत लुट

मालेगाव : शस्त्राचा धाक दाखवत यंत्रमाग कारखानदाराकडून 28 हजार रुपयांची लुट केल्याप्रकरणी आयेशानगर पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी एजाज अहमद खुर्शिद अहमद यांनी फिर्याद दाखल केली आहे.

इस्लामपुरा भागातील रहिवासी एजाज अहमद हे आपल्या यंत्रमाग कारखान्यातील कामकाज आटोपून मोटार सायकलन घरी जात होते. वाटेत मुफ्ती आजम मशिदीजवळ दोघा मोटार सायकलास्वारांनी त्यांना अडवले. त्या दोघांनी शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील तिन हजार रुपये आणि बॅंकेचे एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर चाळीसगाव फाट्यानजीक साठ फुटी रस्त्यावर नेऊन एटीएमचा पिन विचारुन एटीएममधून पंचविस हजार रुपये काढून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here