‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती व नवागत कलाकार आशुतोष भाकरे याने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. आशुतोष याने काही मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
आशुतोष भाकरे याने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ अशा काही चित्रपटात काम केले आहे. आशुतोष हा काही दिवसांपासून कोणत्या तरी तणावात होता. काही दिवसांपूर्वी त्याने ‘फेसबुक’वर एक व्हिडीओ टाकला होता. व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत त्याने विश्लेषण केले होते.
आशुतोष व मयुरी देशमुख यांनी 21 जानेवारी 2016 रोजी लग्न केले होते. सन 2017 मध्ये ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने एका वृत्तपत्रात दोघांची लव्हस्टोरी प्रकाशित झाली होती. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या माध्यमातून मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने लोकप्रियता मिळवली आहे.