बनावट कागदत्रांद्वारे राष्ट्रपती पदक मिळवल्याबद्दल गुन्हा

On: March 11, 2022 10:03 PM

पुणे : बनावट कागदपत्रांच्या मदतीने राष्ट्रपती पदक प्राप्त केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलातील पोलिस कर्मचारी गणेश जगताप व इतरांविरुद्ध वानवडी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश अशोक जगताप, नितेश अरविंद आयनुर, रविंद्र धोंडीबा बांदल व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यां कर्मचा-यांची नावे आहेत. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिस दलात खळबळ माजली आहे. 26 जुलै 2017 ते 29 जानेवारी 2020 या दरम्यान हा गैरप्रकार घडला आहे.

सन 2017 ते 2020 या कालावधीत हवालदार गणेश जगताप वानवडी पोलीस स्टेशनला नेमणूकील होते. याच दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयातील गोपनीय विभागात नितेश आयनुर हे कनिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. वानवडी पोलीस स्टेशनचा समावेश असलेल्या परिमंडळ 5 मध्ये वरिष्ठ लिपिक रवींद्र बांदल हे देखील नेमणुकीस होते. या दोघा लीपिकांच्या सहकार्याने हवालदार गणेश जगताप यांनी त्यांच्या सेवा पुस्तिकेतील नोंदीत फेरफार करुन बनावट दस्त तयार केल्याचा आरोप आहे. त्यावर बनावट सह्या व सरकारी शिक्यांचा गैरवापर केल्याप्रकरणी दोन वर्षाची वेतनवाढ रोखण्याची त्यांना शिक्षा झाली होती. याबाबतचा तपशील नष्ट केल्याचा ठपका देखील जगताप यांच्यावर आहे. 13 फेब्रुवारी 2018 रोजी हवालदार गणेश जगताप यांना शिक्षा झाली आहे. संबंधीत पोलिस स्टेशनच्या डे बुक कर्मचा-यांनी जबाबदारी बाजूला सारुन जगताप यांना मदत केल्याचे निदर्शनास आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment