अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा अटकेत

On: March 12, 2022 7:31 PM

जळगाव : दोन वर्षापुर्वी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणा-या आरोपीस एलसीबी पथकाने अटक केली आहे. रोशन गणेश राणे (राजपूत) रा. इंदीरा नगर अडावद ता. चोपडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोन वर्षापुर्वी रोशन याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यासह त्याने पळवून नेलेल्या मुलीला ताब्यात घेतले असून पुढील तपासकामी दोघांना अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण जाधव, वैशाली सोनवणे, पो.कॉ. विनोद पाटील, चालक पो.कॉ. मुरलीधर बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment