आईच्या पोटात चाकू मारणा-या मुलास अटक

On: March 14, 2022 9:56 AM

अमरावती : आईच्या पोटात चाकू मारुन जखमी करणा-या अमरावती शहरातील आनंद नगर भागातील रहिवासी तरुणाला अटक करण्यात आली आहे. 11 मार्च रोजी रात्री सदर घटना घडली होती. खोलापूरी पोलिसांनी गजानन सहदेव वानखेडे या हल्लेखोर तरुणाचा शोध घेत त्याला 12 मार्च रोजी अटक केली. रुख्मिनी वानखेडे असे मुलाकडून चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

या जीवघेण्या हल्ल्यामुळे घटनेच्या वेळी एकच हल्लकल्लोळ माजला होता. हल्लेखोर गजानन तेथून चाकूसह पळून गेला होता. जखमी महिलेस तिचा मोठा मुलगा आकाश याने तातडीने दवाखान्यात दाखल केले. गजानन वानखेडे याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी खोलापुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अटकेत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment