मोबाईल हिसकावण्यासह घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस

On: March 14, 2022 7:29 PM

जळगाव : मोबाईल हिसकावून पळून जाण्यासह मोटार सायकल चोरी आणि घरफोडी असे एकुण सात गुन्हे एलसीबी पथकाने उघडकीस आणले आहेत. एलसीबी पथकाच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. यात मोबाईल स्नॅचींगचे 2, घरफोडीचे 2 आणि मोटार सायकल चोरीचे 3 गुन्हे आहेत. गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहरात या तिन प्रकारच्या गुन्ह्यांनी धुमाकुळ माजवला होता. या घटनांची दखल घेत एलसीबी पथकाने सदर तपास लावला आहे.

युसुफ शेख उर्फ चिल्या इसा शेख (रा. शिवाजी नगर हुडको जळगाव) व त्याचे अल्पवयीन साथीदार जळगाव शहरात मोबाईल हिसकावून पलायन करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाला या तपासकामी रवाना केले होते. तपास पथकाने युसुफ शेख याचा शोध लावून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या कबुलीनंतर त्याला अटक करण्यात आली. युसुफ शेख उर्फ चिल्या याने दिलेल्या कबुलीनंतर जिल्हापेठ जळगाव पोलिस स्टेशन, चोपडा शहर पोलिस स्टेशन, जळगाव शहर पोलिस स्टेशन, शनीपेठ पोलिस स्टेशनला दाखल एकुण सात गुन्हे उघडकीस आले. त्यात मोबाईलशी संबंधीत 2, घरफोडीचे 2 आणि मोटारसायकलचे 3 असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जालींदर पळे, सहायक फौजदार युनुस शेख, अशोक महाजन, हे.कॉ. सुनिल दामोदरे, विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, संदीप सावळे, पोना अविनाश देवरे, रविंद्र पाटील, दिपक शिंदे, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील चालक सफौ राजेंद्र पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि जालींदर पळे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment