पशुधनाची चोरी करणा-या तिघांना अटक

On: March 14, 2022 8:11 PM

जळगाव : गुरा ढोरांची चोरी करणा-या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अटक केली आहे. शाकिर शहा ऊर्फ पप्पु बंम इब्राहिम शहा रा.आझादनगर भोईवाडा, धुळे, सद्दाम ऊर्फ बोबडया रशिद शेख रा.बाबानगर, धुळे व नईम शाह सलीम शहा रा.भोईवाडा वडजी रोड, धुळे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.

अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुरे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पुढील तपासकामी तिघा आरोपींना अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सुधाकर लहारे, पोहेकॉ अश्रफ शेख निजामोउद्दीन, सुधाकर रामदास अंभोरे, चापोहेकॉ विजय गिरधर चौधरी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment