धारदार शस्त्राच्या हल्ल्यात तरुण जखमी

On: March 14, 2022 9:40 PM

जळगाव : जुन्या वादातून दोघा तिघांनी केलेल्या धारदार शस्राच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. अनिल रसाळ राठोड (22) रा. कासमवाडी जळगाव असे उपचार घेणा-या जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी तरुणाने दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला सोनू गोपाल चौधरी व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दस-याच्या दिवशी जखमी अनिल राठोड याचा लहान भाऊ सुनिल राठोड आणि गौरव चौधरी नावाच्या तरुणासोबत वाद झाला होता. गौरवने त्यावेळी पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर अनिल राठोड, सुनिल राठोड या दोघा भांवासह रोहीत भालेराव आणि अमन सोनवणे अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच कारवाई देखील झाली होती. अनिल राठोड हा आज दुपारी घरी येत होता. त्यावेळी त्याच्या मागून आलेल्या सोनू गोपाल चौधरी याने अनिलच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अनिलने मागे वळून पाहिले असता सोनुच्या हातात धारदार शस्त्र होते. त्याच्यासोबत असलेल्या दोन ते तिन इसमांच्या हातात देखील शस्त्र होते. डोक्याला मार लागल्यामुळे अनिल यास काही सुचत नव्हते. तो घराच्या दिशेन पळत आला. त्याच्या आई वडीलांनी त्याचा बचाव करत त्याला खासगी दवाखान्यात दाखल केले. त्याने दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद कठोरे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment