नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या

On: July 30, 2020 1:12 PM

जळगाव : यावल तालुक्यातील तालुक्यातील चुंचाळे या गावी अवघ्या विस वर्षाच्या नवविवाहित गर्भवतीने मध्यरात्री गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने यावल तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी चुंचाळे परिसरासह यावल तालुक्यात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. राजश्री अमृत पाटील (20) असे मयत विवाहितेचे नाव असून ती आठ महिन्यांची गर्भवती होती. मध्यरात्री लघुशंकेसाठी उठल्यावर हा प्रकार लक्षात आला असे तिच्या पतीचे म्हणणे आहे. त्याबाबत तिच्या पतीने यावल पोलिसात खबर दिली आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment