चाकू हल्ल्यातील फरार आरोपीस अटक

On: March 16, 2022 7:27 PM

जळगाव : जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यातील फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. रोहीत उत्तम भालेराव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेतील सुनिल रसाल राठोड, अनिल रसाल राठोड, अमन चंद्रकांत सोनवणे अशा तिघांना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. गुन्हा घडल्यापासून रोहीत भालेराव हा फरार होता.

16 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री बारा वाजता कासमवाडी परिसरात प्रशांत गोपाल चौधरी या तरुणावर सुनिल राठोड याच्यासह रोहीत भालेराव, अनिल राठोड, अमन सोनवणे या चौघांनी गंभीर दुखापत केली होती. पो.नि. प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने रोहीत भालेराव यास तुकारामवाडी परिसरातून अटक केली. सहायक फौजदार अतुल वंजारी, सुनिल सोनार, सुधीर साळवे, किशोर पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. अटकेतील रोहीत भालेराव यास न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगीचे आदेश देण्यात आले. सरकारपक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुरडकर यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment