अनैतिक संबंधात अडसर ठरणा-या पतीची हत्या

On: March 17, 2022 2:34 PM

बुलढाणा : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे मंगळवारी घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. पत्नी व प्रियकर गजाआड झाले आहेत.

गोरेगाव येथील एका विवाहीतेचे त्याच गावातील एजाज खान या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधाबाबत विवाहितेच्या पतीला माहिती मिळाली होती. त्यामुळे पती पत्नीत वाद सुरु झाले होते. दरम्यान प्रियकर एजाजने याप्रकरणी तिच्या पतीची माफी मागीतली होती. मात्र काही दिवसांनी पुन्हा दोघांमधे प्रेमप्रकरण सुरु झाले. काही दिवसांपूर्वी ती विवाहीता तिच्या पतीसमवेत अहमदनगर येथे कामानिमीत्त गेली होती. तेथून 14 मार्च रोजी दोघे गावी परतले. 15 मार्च रोजी दोघा पती पत्नीत पुन्हा वाद झाले. त्यावेळी विवाहितेसह तेथे हजर असलेल्या तिच्या प्रियकराने  मिळून घरातील पलंगावर पतीचे हातपाय बांधले. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. मयत पतीच्या आईने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार साखरखेडा पोलिस स्टेशनला विवाहितेसह तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment