बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह – हत्येचा संशय

On: March 17, 2022 3:07 PM

इगतपुरी : बेपत्ता असलेल्या घोटी येथील व्यक्तीचा मृतदेह मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी शिवारात असलेल्या उंडओहळ नदीच्या पुला खाली मिळून आला. महावीर कुबेर मोदी (53) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्या जखमा आढळून आल्या  आहेत. या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाडीव-हे पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

घोटी येथील संभाजीनगर परिसरात राहणारे महावीर कुबेर मोदी हे गेल्या दहा मार्चपासून बेपत्ता झाल्याप्रकरणी मिसींग दाखल करण्यात आली होती.  त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची मुलगी शीतल हनुमान माळी (रा. इंदिरानगर, घोटी) हिच्या फिर्यादीनुसार अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध वाडीवऱ्हे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment