महिला पोलिसाचा विनयभंग करणा-यास पब्लिक मार

On: March 17, 2022 11:15 PM

जळगाव : कर्तव्यावर असलेल्या महिला वाहतुक पोलिसाचा विनयभंग करणा-या इसमाला पब्लिक मार मिळाल्याची घटना आज शहरातील नेरीनाका चौकात घडली. या घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी सलीम खान अरमान खान पठाण (51) रा. पाळधी मोहल्ला धरणगाव याच्याविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17 मार्च 2022 रोजी सायंकाळी नेरी नाका चौकात शहर वाहतुक शाखेतील एक महिला पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावण्याकामी हजर असतांना सलीम खान हा तेथे आला. आल्या आल्या त्याने सदर महिला पोलिस कर्मचा-याकडे मनिषा मॅडमच्या मोबाईल क्रमांकाची मागणी केली. आपल्याकडे मनिषा मॅडमचा मोबाईल क्रमांक नसल्याचे उत्तर मिळताच सलीम खान यास राग आला. मी रिपोर्टर असून तुझा साहेब मला सलाम करेन अशा भाषेत तो बोलू लागला. यानंतर तर त्याने हद्दच केली. त्याने सदर महिला पोलिस कर्मचा-याचा हात धरुन तिचा मोबाईलमधे फोटो काढला. या प्रकाराने तेथील वातावरण बिघडले. सदर महिला पोलिसाने शनीपेठ पोलिस स्टेशनला फोन करुन कर्मचारी बोलावून घेतले. दरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला आपला पब्लिक मार देण्यास सुरुवात केली होती. त्याला शनीपेठ पोलिस स्टेशनला नेण्यात आल्यानंतर त्याच्य्याविरुद्ध योग्य तो गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment