खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा

On: March 18, 2022 11:49 AM

औरंगाबाद : स्वत:ला पत्रकार म्हणवणा-या तोतया पत्रकाराने जळगावला महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतांना औरंगाबाद येथे एका तोतया खंडणीबहाद्दर पत्रकारासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख रफिक असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे.

रफीक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला संगनमत करुन शहरातील निराला बाजार येथे एका कॉस्मेटिक दुकानात गेले होते. तुमचे दुकान बोगस असून ते सुरु ठेवायचे असल्यास पन्नास हजार द्यावे लागतील असे त्यांनी दुकानमालकीन महिलेला 11 मार्च रोजी म्हटले होते. त्यानंतर 14 मार्च रोजी रात्री रफीक पुन्हा दुकानात आला. पैशासह तुम्हाला माझ्यासोबत रहावे लागेल असे तो दुकान मालकीन महिलेस म्हणू लागला. त्यामुळे संतप्त दुकान मालक महिलेने क्रांती चौक पोलिस स्टेशन गाठत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment