अनैतिक संबंधात अडथळा – खूनातील दोघांना पोलिस कोठडी

On: March 18, 2022 12:58 PM

बुलढाणा : अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या पतीचा खून करणा-या पत्नी व प्रियकरास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे सदर घटना घडली होती. एजाज खान व एका विवाहीत महिलेचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोघांनी मिळून विवाहितेच्या पतीला पलंगावर हातपाय बांधून दोरीने गळफास देत ठार केले होते.

दोघांच्या संबंधाची विवाहितेच्या पतीला माहिती झाल्यानंतर दोघात वाद सुरु झाले होते. त्यानंतर प्रियकर एजाजने विवाहीतेच्या पतिची माफी मागून वाद मिटवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा दोघातील संबंध सुरु झाले होते. दोघा संशयीत आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment